जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२१ । आमदार चिमणराव पाटील यांनी एरंडोल नगरपालिकेचे प्रशासक विकास नवाळे यांना सदर पाणीपुरवठा योजनेसाठी तात्काळ प्रस्ताव पाठवण्याची सूचना केली आपण लवकरच या योजनेला मंजुरी आणू अशी आमदार चिमणराव पाटील यांनी ग्वाही दिली. या योजनेअंतर्गत ८० किलोमीटर लांबीची नवीन जलवाहिनी व पाण्याचे चार जलकुंभ नगरपालिका परिसर ओम नगर श्रीराम नगर उत्तम नगर या भागात उभारण्यात येतील तसेच जलशुद्धीकरण केंद्राची चार एम एल टी ने क्षमता वाढवण्यात येईल तसेच अंजनी धरणातील पाणी योजनेच्या उद्धव स्थळी २० एचपी ची मोटार व १०० एच पी चा पंप बसविण्यात येणार आहे असे सांगण्यात आले या नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे वाढीव शेत्रातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे तसेच शहरातील पाणीपुरवठा सुद्धा सुरळीत होणार आहे.

कोविड सेंटर व ऑक्सिजन व्यवस्था अद्यावत करून घ्या लसीकरणाचे काम वाढवा मास्क लावण्यासाठी जनजागृती करा अशा प्रकारची सूचना आमदार चिमणराव पाटील यांनी कोरोना आढावा बैठकीत केली

या आढावा बैठकीत प्रांत अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार सुचिता चव्हाण नगर पालिका प्रशासन विकास नवाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर फिरोज शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कैलास पाटील गट विकास अधिकारी बी.एस अकलाडे , डॉक्टर निशात शेख, डॉक्टर अरविंद वानखेडे, डॉक्टर धीरज मराठे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव शालिक गायकवाड इत्यादी उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- प्रवाशांना दिलासा ! जळगाव-भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ
- समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय; पालकमंत्री गुलाबराव पाटील
- कर्जबाजारीपणा अन् नैराश्यातून अमळनेरातील तरुण शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त जळगाव पोलिसांची पत्रकारांसाठी छायाचित्र स्पर्धा
- शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी जामनेरचे भाजप नेते संजय गरुडांना अटक ; जळगाव शिक्षण वर्तुळात खळबळ












