सुरक्षेमुळे गिरीशभाऊंना अडचण होऊ शकते, खडसेंचा मार्मिक टोला

ऑक्टोबर 15, 2022 7:34 PM

Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२२ । राज्य सरकारची समिती मध्यरात्री बसली आणि माझी सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतला. मी सुरक्षा मागितली नव्हती, मला तुम्हीच दिली. मला सुरक्षेची गरज नाही. गिरीश महाजन म्हणाले मला सुरक्षेची काय गरज? खरं आहे सुरक्षेमुळे काही वेळेस गिरीशभाऊंना अडचण होऊ शकते. गिरीश भाऊ कुठेही जातात, माझं काय मी सरळ सरळ फिरतो. माझ्या मागे पुढे कोण असतं हे सर्वांना माहिती आहे, असा मार्मिक टोला माजी मंत्री, आ.एकनाथराव खडसे यांनी लगावला.

jalgaon 2022 10 15T174445.140 jpg webp

जळगाव जिल्हा दूध संघातील चोरी प्रकरणी गेल्या पाच दिवसापासून जळगाव जिल्ह्यातील राजकारण पेटले आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्याबाहेर सुरू केलेले आंदोलन तूर्त स्थगित केले आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन आ.मंगेश चव्हाण यांनी खडसे कुटुंबावर आणि दूध संघाच्या कार्यकारी संचालकांवर अनेक गंभीर आरोप केले होते. आ.चव्हाण यांनी खडसेंना अनेक विषयाबाबत खुले आव्हान देखील दिले होते. चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेनंतर सायंकाळी आ.एकनाथराव खडसे यांनी आपल्या जळगावातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली असून माध्यमांशी संवाद साधला आहे.

पहा काय म्हणाले खडसे :
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/465739105623446

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now