दाणा बाजारातून दुचाकी लांबविली

एप्रिल 14, 2022 3:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । येथील दाणाबाजार परिसरातून ३५ हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबविल्याची घटना समोर आली आहे. शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून यात आहे.

two vhilar

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील संदीप दगडु बादांदडे वय २८ हा तरुण ९ एप्रिल रोजी जळगाव शहरातील दाणाबाजारात साहित्य खरेदी करण्यासाठी आला होता. दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्याने त्याची एम.एम.२० एफ.आर. ४२५४ या क्रमाकांची दुचाकी दाणाबाजारातच चिंचेच्या झाडाखाली उभी केली होती. काम आटोपून दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास परतल्यावर दुचाकी जागेवर मिळून आली नाही. सर्वत्र शोध घेतला असता दुचाकी मिळून आली नाही. अखेर दोन दिवसांनंतर संदीपने जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भास्कर ठाकरे हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now