जळगाव लाईव्ह न्यूज । 6 फेब्रुवारी 2024 । एकीकडे कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातच सोयाबीनचा भाव घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सोयाबीनच्या दरात १ हजार ते १२०० रुपयांची घसरण झाली असून सध्या स्थितीला सोयाबीनला ४१००- ४२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळतोय.
जळगाव जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे सोयाबीन चांगल्या स्थितीत होते; मात्र, इतर जिल्ह्यांमध्ये सोयाबीनला पावसाअभावी तर काही ठिकाणी अतिपावसामुळे फटका बसला आहे.सुरुवातीला सोयाबीनला ४५०० ते ५००० रुपयापर्यंतचा भाव मिळाला. यापूर्वी २०२१ मध्ये सोयाबीनला विक्रमी ९ ते ११ हजारांचे दर मिळाले होते.
काही शेतकऱ्यांनी भाव आणखी वाढेल ह्या आशेवर सोयाबीन साठवून ठेवली होती. मात्र भाव वाढण्याऐवजी घसरल्याचे दिसून आले. सोयाबीनच्या दरात १ हजार ते १२०० रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या सोयाबीनला ४१०० ते ४३०० रुपयापर्यंतचा भाव मिळत आहे.