सापडलेला मोबाईल दिला पोलिसांच्या ताब्यात

एप्रिल 2, 2022 5:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२२ । शहरातील कोल्हे नगर परिसरात एका व्यक्तीला सॅमसंग कंपनीचा अँड्रॉइड मोबाइल सापडला असता त्यांनी थेट पोलीसांच्या हाती दिला आहे. यामुळे ‘त्या’ व्यक्तीचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

good 1 jpg webp

शहरातील कोल्हे नगर परिसरातील शंभर फुटी रोडवर कैलास बडगुजर यांना एक सॅमसंग कंपनीचा अँड्रॉइड मोबाइल सापडला. त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल अजय सपकाळे यांच्याकडे दिला. तसेच संबंधित व्यक्तीचा शोध घेत त्याला मोबाइल देण्याचे आवाहन देखील केले होते. दरम्यान, सदर मोबाईल अभियंता इलेक्ट्रिकल सुनील पाटील यांचे होते. मोबाईल ‘च्या’ डिस्प्लेवर दिसणाऱ्या व्हाट्सअप ग्रुपच्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क केले असता सुनील पाटील यांचे असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now