Sunday, December 4, 2022

तरुणाचे मोबाईल तिघा भामट्यांनी लांबविले

जळगाव लाईव्ह न्युज । १९ जून २०२२ । शहरातील रिक्षात बसलेल्या एका तरुणाला दमदाटी करत त्याचा मोबाईल व पाकीट हिसकावत पलायन केल्याची घटना आज घडली आहे.

- Advertisement -

मुक्ताईनगरातील रहिवासी असलेल्या एक तरुण नवीन बसस्थानकातून बी.जे.मार्केटला जाण्यसाठी रिक्षात बसला होता. या रिक्षात बसलेल्या तिघांनी दमदाटी करुन मोबाईल व पाकीट हिसकावत पलायन केले आहे. या प्रकरणी जिल्‍हापेठ पोलिसांत या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मुक्ताईनगरातील रहिवासी असलेला योगेश भागवत घाटे (वय-२५) हा तरुण सॉफ्टवेअर अभियंता असून रोजी मुक्ताईनगर ते जळगाव बसने प्रवास करुन साडेचार वाजता नवीन बसस्थानकात उतरला. येथून मित्राला भेटायला जायचे असल्याने तो, बसस्टॅण्ड बाहेरच ऑटो रिक्षात बसला. मात्र, त्यात पूर्वीपासूनच तीन तरुण बसलेले असल्याने त्यापैकी एकाने धक्काबुक्की करत रिक्षात जागा नाही. असे म्हणुन धक्का देत योगेश घाटे याला उतरवून दिले.

- Advertisement -

योगेशच्या खिश्यातील पाकीट मोबाईल काढून घेत रिक्षाने सुसाट पळून गेले. चोरट्यांनी पाकीटातील दिड हजार रोख, महाराष्ट्र व स्टेट बँकेचे एटिएम कार्ड असे बळजबरीने काढून घेत धमकावले. योगेश घाटे याने दिलेल्या तक्रावरुन जिल्‍हापेठ पोलीस ठाण्यात तिघा अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -
[adinserter block="2"]