बापरे ! ती बेपत्ता महिला सापडली पण अर्धवट जळालेली आणि मेलेली

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२२ । शिरपूर तालुक्यातील नटवाडे शिवारात करवंद नटवाडे रस्त्यावर एका महिलेचा जळत असलेला अर्धवट मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला आहे.सदर महिला ही शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता असलेल्या.निर्मला सुनील पावरा वय 25  रा.नटवाडे ता.शिरपूर या  म महिलेचा असल्याचे निष्पन्न करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे

         शिरपूर तालुक्यातील करवंद नटवाडे शिवारात झिराई नाल्याजवळ रस्त्याच्या कडेला अंदाजे 25 ते 30 वर्षीय महिलेचा मंगळवारी सकाळी अर्धवट जळत असलेला स्थितीत मृतदेह आढळून आला. घटनास्थळी मृतदेह आढळून आलेली महिला ही अंदाजे 25 ते 30 वयोगतील विवाहित असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.सदर महिलेचा अज्ञात कारणांनी दगडाने ठेचून काहीतरी ज्वलनशील पदार्थ ओतून जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले तसेच घटनास्थळी रक्ताने माखलेले तीन दगड आढळून आले आहे याबाबत नटवाडे येथील पोलीस पाटील प्रकाश मालसिंग पावरा यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद देशमुख, एपीआय गणेश फड, पीएसआय किरण बा-हे, पोहेकॉ प्रेमसिंग गिरासे,पंकज पाटील,रुपेश गांगुर्डे,भरत चव्हाण,पोकॉ विनोद आखडमल, गोविंद कोळी प्रवीण गोसावी,प्रशांत पवार  आदी कर्मचाऱ्यांनी धाव घेत पाहणी केली. तसेच धुळे येथून श्वान पथक व फॉरेन्सिक पथकास पाचारण करीत परिसरातील कोणी महिला बेपत्ता आहे आहे याबाबत शहर पोलिसांकडून शोध घेतला जात होता.मात्र शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी सखील मार्गदर्शन।करीत आणि अनुभवाचा वापर करीत कोणतीही ओळख नसतांना सदर महिलेची ओळख पटविण्यास यश मिळविले.याप्रकरणी शहर पोलिसांनी मयत महिलेचा पती सुनील रुलसिंग पावरा यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद देशमुख करण्यात येत आहे .