⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

महापौरांनी केले गुढीपूजन, उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन नवेवर्षाचे स्वागत

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२२ । शहरातील मनपाच्या प्रागंणात संस्कार भारतीच्या वतीने गुढी पाडवा (gudi padava) पहाट कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन नववर्षाची सुरवात करण्यात आली तर महापौरांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले.

पहाटेच्या मंगल वातावरणात सुवासिनींनी केलेले (Gudi Pujan) गुढीपूजन व त्याचसोबत मान्यवरांनी उगवत्या सूर्याला दिलेले अर्घ्य व मंचानवरुन साधकांनी सुरेल सादर केलेली लता मंगेशकरांची गाजलेली गीते (Lata Mangeshkar) अशा प्रसन्न मुहुर्तावर (Sanskarbharati) संस्कारभारतीची गुढीपाडवा पहाट साजरी झाली. मनपा प्रांगणातील कार्यक्रमाची सुरुवात “ओम नमोजी आदया या संत ज्ञानेश्वरांच्या रचनेने झाली तर जयोस्तुते श्री महन्मंगले या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रचनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

कार्यक्रमात सुरवातीला भारतरत्न स्व.लता मंगेशकर यांची गाजलेली गीते हे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. कार्यक्रमात सहभागी असलेले कलासाधक संपदा छापेकर, स्वाती डहाळे, अथर्व मुंडले, निळकंठ कासार, दिलीप चौधरी (तबला), राजेंद्र माने (संवादिनी), गिरीष मोघे (तबला) यांनी सुरेल गीते सादर केली अभ्यासपूर्ण निवेदन वैदेही नाखरे यांनी केले कथक कला मंदीरच्या रमा करजगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कारभारती गीत, आज गोकुळात रंग या गीतांवर रसिका ढेपे, निधी गायकवाड, विप्रा तळेले, सानिका शेठ, मिताली सपकाळे, स्तुती (शमा समृध्दी ब्राम्हणे देवश्री पाटील, कुंतल वाघमारे, अनुष्का पोतदार, युक्ता नाईक, श्रावणी बावसकर यांनी सामुहीक नृत्य केले. गुढीचे पूजन (Mayor Jayashreetai Mahajan) महापौर जयश्रीताई महाजन, मायाताई धुप्पड (जेष्ठ साहीत्यीका), गीता रावतोळे रेखाताई लढे, सुनंदा सुर्वे, कल्पना नेवे, रमा करजगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी उपमहापौर कुलभुषण पाटील, अनील अभ्यंकर, मोहन रावतोळे, डॉ.सुभाष महाले, डॉ.पुरुषोत्तम पाटील, चिंतामण पाटील, सुहास देशपांडे व किशोर सर्वे यांची उपस्थिती होती.