⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

सरपंचांच्या मागण्या शासन दरबारी मांडणार; परिषदेच्या बैठकीत निर्णय

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । सरपंच परिषदेच्या यावल तालुका कार्यकारणीची बैठक गुरुवार दि.२ रोजी शेतकी संघाच्या कार्यालयात परिषदेचे पैठण तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून सरपंचांना येणाऱ्या अडचणी व मागण्या शासन दरबारी मांडून त्या सोडवून न्याय आणि हक्क मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले.

यावेळी जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे, सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वय बाळू धुमाळ, बाळू चव्हाण, युवराज पाटील, बाजार समितीचे माजी सभापती नितीन चौधरी, पं.स. गटनेते शेखर पाटील, दहिगावचे उपसरपंच किशोर महाजन, माजी सरपंच जलील पटेल, दहिगाव सरपंच अजय अडकमोल, प्रसिद्धी प्रमुख तथा कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल, किनगाव बु.सरपंच भूषण पाटील, मारुळ सरपंच असद सय्येद, महिला तालुका अध्यक्ष तथा हंबर्डीचे सरपंच अलका पाटील, संजय पाटील, मोहराळेचे सरपंच नंदा महाजन, महेलखेडीचे सरपंच शरिफा तडवी, बामनोदचे सरपंच राहुल तायडे, बोरखेडाचे सरपंच राजेश तलेले, कोळन्हावीचे सरपंच विकास सोळंखे, अंजळले सरपंच यशवंत सपकाळे, पिंपरुड सरपंच योगेश कोळी, लिधररी सरपंच नंदकिशोर सोनवणे, अट्रावल सरपंच मोहन बाविस्कर, मनवेल सरपंच जयसिंग सोनवणे, शिरसाड सरपंच दीपक इंगळे, अजय भालेराव, भालोदचे सरपंच प्रदीप कोळी, कोळवद सरपंच याकूब तडवी, आमोडे सरपंच हसीना तडवी यांसह तालुक्यातील सरपंच, उपसरपंचासह २०० वर सदस्य उपस्थित होते.