⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

प्रहार जनशक्ती व साधनाई फाऊंडेशनतर्फे आयोजित मेळाव्यात ५०० युवकांना मिळणार रोजगार

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१ । प्रहार जनशक्ती पक्ष व साधनाई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भडगाव येथे गुरुवार दि.१८ रोजी डी.एड. कॉलेजच्या प्रांगणात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात जळगावसह विविध जिल्ह्यातील तरुणांनी सहभाग नोंदविला. यात ५०० तरुणांना रोजगार मिळणार आहे.

कोरोनाच्या काळात बेरोजगार झालेल्या तरुणांना रोजगार मिळावा या हेतूने प्रहार जनशक्ती पक्ष व भडगाव येथील साधनाई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व पुणे येथील पी.आर.एम. स्विक्युरिटी सर्व्हिस यांच्या सहकार्याने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक नानासाहेब पाटील हे होते. मेळाव्यास जळगावसह औरंगाबाद, बुलढाणा, अकोला, नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, धुळे आदी जिल्ह्यातील पाच ते सहा हजार युवकांनी हजेरी लावली. उपस्थित उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. यात पात्र ठरलेल्या पाचशे युवकांची गुणवत्ता यादीनुसार निवड करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या संकटात असंख्य तरुण बेरोजगार झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील अनेक कुटुंबीय शेतीवर अवलंबून आहेत त्यातच पूर व अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे, ह्या सर्व बाबींचा विचार करून शेतकरी व इतर तरुण बांधवांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले यांनी सांगितले. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी प्रहारचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, सरचिटणीस देवा महाजन, विद्यार्थी आघाडीचे अक्षय चांदगुडे, निरज खैरनार, शुभम भोसले, गोलू राजपूत, जयोदीप अहिराराव, उमेश कोळी, तेजस देवरे, भूपेंद्र पाटील, पवन पाटील, स्वप्नील सोनवणे, राकेश पाटील, भूषण चौधरी, स्वप्निल बेडिसकर, अमोल पाटील, विजय महाजन, संजय कोळी, दुर्गेश गाडगे, सौरभ भोसले, मयूर पाटील, तुषार महाजन, दादू पाटील, सौरभ देशमुख, अनस शेख आदींनी परिश्रम घेतले.