⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

थंडीच्या कडाका वाढला, पालेभाज्या स्वस्त तर इतर भाजीपाला महागला

जळगाव लाईव्ह न्यूज । हमीद बारेला । शहरात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण व थंडीची लाट कायम असून नागरिकांना हुडहुडी भरली आहे. वातावरणात गारठा झाला असला तरी पालेभाज्या खराब होण्याची शक्यता गृहीत धरून शेतकऱ्यांनी बाजारात आवक वाढवली आहे. परिणामी पालेभाज्या स्वस्त आहेत तर इतर भाजीपाला महागला आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून थंडी वाढलेली असून पारा १० अंशाच्या आत पोहचला आहे. त्यातच गेल्या आठवड्यात पावसाचे देखील वातावरण निर्माण झाले होते. थंडी वाढली असल्याने भाजीपाल्याचा बाजार देखील नरम-गरम आहे. सध्या बाजारात वांगे ६० रुपये किलो, कांदा २५ रुपये, बटाटे २० रुपये किलो आहेत. तसेच भाजीपाल्यात भेंडी ७० रुपये, चवळी ४० रुपये, गवार १०० रुपये, मेथी २० रुपये, पालक १० रुपये गड्डी, पोकळा ३० रुपये, कोथिंबीर ३० रुपये, शेवगा १२० रुपये, कारले ८० रुपये, कोबी ४० रुपये, ५० रुपये, मिरची ६० रुपये, वाटणे ४० रुपये किलो आहे.

गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणाचा परिणाम म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी पालेभाज्यांची आवक वाढवली आहे. परिणामी पालेभाज्यांचे दर अचानक खाली आले आहेत. ढगाळ वातावरण आणि थंडीमुळे शेतकरी बांधवावर भीतीचा डोंगर उभा असल्याने शेतातील भाजीपाल्याची कापणी करण्यास सुरुवात केली आहे. बाजारात सध्या शेवगा सर्वात महाग असून पालक सर्वात स्वस्त आहे. काही महिन्यांपूर्वी २०० रुपये किलो असलेली कोथिंबीर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली आहे.

आवक वाढल्याने पालेभाज्या स्वस्त
गेल्या पंधरा दिवसापासून बाजार समितीमध्ये पालेभाज्यांची आवक वाढली आहे. आवक वाढल्याने भाजीपाला स्वस्त झाला आहे. नवीन कांदा बाजारात येत असल्याने कांद्याचे दर देखील खाली घसरले आहे. इतर भाजीपाल्याची आवकच नसल्याने त्यांचे दर अजूनही गगनाला भिडलेले असल्याचे भाजीपाला विक्रेते तुषार चौधरी यांनी सांगितले.

हे देखील वाचा :