एरंडोल तालुक्यातील सहा ग्रामपंचायत निवडणुकीचा वाजला बिगुल

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२२ । एरंडोल तालुक्यातील रवंजे बु, रवंजे खुर्द,दापोरी,पिंपळकोठा प्र.चा,अंतुर्ली खुर्द या सहा गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमुळे थंडीच्या दिवसात राजकीय उब मिळणार आहे. विशेष म्हणजे थेट जनतेतुन सरपंच पदाची निवड होणार आहे.

लोकनियुक्त सरपंच पदाच्या लढती या गावांमध्ये रंगतदार ठरणार आहेत. १८ नोव्हेंबर निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे ,२८ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्रे सादर करणे ,०५ डिसेंबर रोजी नाम निर्देशन पत्राची छाननी ,०७ डिसेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ,०७ डिसेंबर निवडणूक चिन्ह वाटप व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे ,१८ डिसेंबर आवश्यक असल्यास मतदान,२० डिसेंबर मतमोजणी व निकाल घोषित करणे याप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे.

दरम्यान, या निवडणुकींमध्ये राजकीय पक्षांच्या उमेदवारी पेक्षा अपक्ष उमेदवारी करणार्यांची संख्या मोठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.