जंगलात आढळला तरुणाचा मृतदेह, पत्नीचा खुनाचा आरोप

जुलै 2, 2022 1:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२२ । जामनेर तालुक्यातील गारखेडा खुर्द येथे ३५ वर्षीय तरुण मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान त्याच्या पत्नीने खुनाचा आरोप केला आहे. याबाबत जामनेर पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

crime murder

श्याम फकीरा ठाकरे (वय ३५) असे मृत अवस्थेत आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. तालुक्यातील गारखेडा खुर्द येथे आपल्या पत्नी विद्या याच्यासह वास्तव्याला असून शेतीचे काम करून उदरनिर्वाह करीत होते. दि. २४ जून रोजी सकाळी ८ वाजता काही तरी कामानिमित्त घरा बाहेर पडाला. दरम्यान, दि. २५ रोजी तालुक्यातील गारखेडा खुर्द शिवारात नर्सरी च्या सार्वजनिक जागेत या तरुणाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत त्यांची विद्या ठाकरे यांनी जामनेर पोलिसांत फिर्यादी दिली असून खुनाचा आरोप करण्यात आला आहे. घटनास्थळी भारत काकडे, किरण बकाले, किरण शिंदे यांनी भेट दिली. त्यानुसार कुणी तरी अज्ञात व्यक्तीने या तरुणाचा खुन केल्याचे स्प्ष्ट झाले आहे. पुढील दिलीप राठोड करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now