तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. ईच्छुकांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा. विशेष ८वी, १०वी, १२वी आणि पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. Thane DCC Bank Bharti 2025

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०२५ असणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड झाल्यावर तुम्हाला चांगला पगार मिळणार आहे. Thane DCC Bank Recruitment 2025

पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ज्युनियर बँकिंग असिस्टंट | 123 |
| 2 | शिपाई | 36 |
| 3 | सुरक्षा रक्षक | 05 |
| 4 | वाहन चालक | 01 |
| Total | 165 |
पद क्र.1: (i) 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT
पद क्र.2: 08वी ते 12वी उत्तीर्ण
पद क्र.3: 08वी ते 12वी उत्तीर्ण
पद क्र.4: (i) 08वी ते 12वी उत्तीर्ण (ii) चारचाकी वाहन (LMV) परवाना
किती पगार मिळेल?
या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला १५००० ते २०,००० रुपये वेतन मिळणार आहे.या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.
वयोमर्यादा आणि परीक्षा शुल्क ?
या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करताना ५९० ते ९४४ रुपये शुल्क भरावा लागणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांनी निवड ऑनलाइन परीक्षा, कागदपत्रे पडताळणी, मुलाखतीद्वारे होणार आहे. ऑनलाइन परीक्षेत निवड झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे.या नोकरीसाठी निवड झाल्यावर प्रोबेशन कालावधी १ वर्षांचा असणार आहे.












