---Advertisement---
गुन्हे

भीषण अपघात : बस आणि ट्रकच्या धडकेत १४ जणांचा मृत्यू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२२ ।दिवाळीच्या दिवशीच एक वाईट बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मध्य प्रदेशातील रीवा येथे पहाटेच्या सुमारास मोठा अपघात झाला आहे. भीषण रस्ता अपघातात बस आणि ट्रकसह तीन वाहनांची धडक झाली.यावेळी 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात 40 हून अधिक जण जखमी झाले असल्याचेही म्हटले जात आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

https://twitter.com/ANI_MP_CG_RJ/status/1583651500446068736?s=20&t=eWLA3dYLgFTedWlEdkAdRg

accident 21 jpg webp

अधिक माहिती अशी कि. बस हैदराबादहून लखनौला जात होती. या बसमध्ये 100 हून अधिक प्रवासी होते आणि मृतांपैकी बहुतांश उत्तर प्रदेश आणि बिहारमधील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात 40 हून अधिक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---