जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । थायलंड येथील थानापूरा पुकेट येथे नुकताच झालेल्या आशिया ओपन पिकल बॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघाने विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातर्फे सहभाग नोंदवला हाेता. या स्पर्धेचे भारतीय संघातर्फे चोपडा येथील पिकलबॉल क्रीडापटू तेजस महाजन व कुलदीप महाजन यांनी प्रतिनिधीत्व केले.
यांनी स्पॉन्सर केले
प्रारंभी भारतीय संघासाठी खेळताना ऑल इंडिया टीमने सिल्व्हर मेडल मिळवले. तसेच वैयक्तीक स्पर्धेत तेजस यास ओपन मेन्स कॅटेगरीत (सिंगल) सिल्व्हर मेडल मिळाले. ओपन मिश्र दुहेरी टीममध्ये तेजसला सिल्व्हर मेडल मिळाले. ऍडव्हान्स मेन्स सिंगलमध्ये ही तेजसने कांस्य पदकासाेबतच रोख स्वरूपात ही बक्षिस मिळवले. तर कुलदीप यानेही टिम इव्हेंट्समध्ये (ऑलटिम) सिल्व्हर मेडल तर ऍडव्हान्स मिश्र दुहेरीत गोल्ड मेडल प्राप्त केले. चोपडा येथील भूपेंद्र पोळ यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. या पूर्वीही या दाेन्ही बंधूंनी नांदेड, बेंगलोर, उत्तराखंड, इंदूर, जयपूर, मुंबई जिमखाना तसेच नेपाळ येथील स्पर्धेत विजेतेपद पटकावले अाहे. या दाेघांना त्यांचे वडील रवींद्र नारायण महाजन व आई माया महाजन यांचे मार्गदर्शन मिळाले. मनसेचे नेते अनिल वानखेडे, नगरसेविका संध्या महाजन, शिवसेनेचे शहरप्रमुख नरेश महाजन यांनी त्यांचे कौतुक केले आहे. मुंबई येथील अरविंद प्रभू व सुरेश भंसाळी यांनी तेजस यास तर कुलदीप यास अरविंद प्रभू यांनी स्पॉन्सर केले होते.