निराधार मुला-मुलींच्या बालगृहात तहसीलदाराने केला मुलाचा वाढदिवस साजरा!

सप्टेंबर 23, 2022 7:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२२ । एरंडोल येथील तहसीलदार सुचिता चव्हाण यांचा ५ वर्षीय मुलगा विहान याचा वाढदिवस खडके बुद्रुक येथे अनाथ व निराधार मुला मुलींच्या बालगृहात आगळा वेगळा पद्दतीने साजरा करण्यात आला. यावेळी तहसीलदार चव्हाण यांनी बालकांच्या समस्या आस्थावाईकपणे जाणून घेतल्या.

jalgoan 20 1

यावेळी बालगृहातील बालकांनी वाढदिवसानिमित्त विहान याला शुभेच्छा दिल्या विशेष हे की, तहसीलदार चव्हाण यांनी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त बाहेरचे काही ना आणता बालगृहातील बालकांसाठी कढी, भात, पोळी, पनीर, भाजी, पापड व मुगडाळ शिरा असे रुचकर भोजन दिले. या प्रसंगी सागर आहेर, शरदराव चव्हाण, शुभांगी चव्हाण, अनन्या आहेर, राहुल तिवारी, अर्चना तिवारी, शशिकांत महाजन, मधु पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधीक्षक मधुकर कपाटे, प्रमोद पाटील, तुषार अहिरे, गणेश पंडित, ज्ञानेश्वर पाटील, अरुणा पंडित यांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now