TATA च्या चाहत्यांना झटका! कंपनीने सर्वच कारच्या किमती वाढवल्या, पहा कितीने झाली वाढ?

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२३ । तुम्ही जर टाटा मोटर्सची कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कारण टाटा मोटर्सने 1 फेब्रुवारी 2023 पासून त्यांच्या कारच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या सर्व ICE आणि CNG कारच्या किमती वाढवल्या आहेत.

मात्र, इलेक्ट्रिक मॉडेल्सच्या किमती पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आल्या आहेत. वाढत्या किमती तसेच नियामक बदलांमुळे वाढलेला खर्च लक्षात घेऊन किमतीत ही वाढ करण्यात आल्याचे टाटा मोटर्सने म्हटले आहे. कंपनीने व्हेरिएंटच्या आधारे किंमत 1.2 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे.

टाटाच्या फ्लॅगशिप एसयूव्ही- हॅरियर आणि सफारी 25,000 रुपयांनी महागल्या आहेत. आता हॅरियरची किंमत 15 लाख ते 22.60 लाख रुपये झाली आहे तर सफारीची किंमत 15.65 लाख ते 24.01 लाख रुपये आहे. या किंमती एक्स शोरूम आहेत. दुसरीकडे, सर्वाधिक विकली जाणारी (महिन्यानुसार) SUV Nexon 17,000 रुपयांपर्यंत महाग झाली आहे. टाटाच्या या सब-4-मीटर एसयूव्हीची किंमत 7.80 लाख ते 14.30 लाख रुपये आहे.

Tiago आणि Tigor दोन्ही 15,000 रुपयांनी महागले आहेत. त्यांचे सीएनजी प्रकारही महाग झाले आहेत. टाटा टियागोची किंमत आता ५.५४ लाख ते ८.०५ लाख रुपये आहे. त्याच्या NRG आवृत्तीच्या किमती ६.६२ लाख ते ७.९५ लाख रुपये आहेत. तर टिगोरची किंमत आता ६.२० लाख ते ८.९० लाख रुपये आहे. याशिवाय अल्ट्रोजच्या किमतीत 15,000 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. Tata Altroz ​​ची किंमत आता 6.45 लाख ते 10.40 लाख रुपये आहे.

प्युअर ट्रिम वगळता, टाटा पंचच्या सर्व प्रकारांच्या किंमती 10,000 रुपयांनी वाढल्या आहेत. या टाटा मायक्रो एसयूव्हीची किंमत ६.०० लाख ते ९.४७ लाख रुपये आहे.