जळगावची तन्वी मल्हारा दिसणार आता TV वर, ‘या’ मालिकेत साकारणार मुख्य भुमिका

मे 15, 2022 12:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२२ । जळगाव शहरातील मल्हार हेल्प केअरचे आनंद मल्हारा यांची कन्या तन्वी मल्हार (Tanvi Malhara) हिने मालिकेच्या दुनियेत पाऊल ठेवून लक्ष वेधले आहे. टीव्हीवर लवकरच सुरू होणाऱ्या ‘मुस्कुराने की वजह तुम हो’ या मालिकेत ती मुख्य अभिनेत्रीचे पात्र साकारणार आहे. कलाकार कुणाल जयसिंग साेबत या मालिकेत ती मुख्य भूमिकेत असेल.

Tanvi Malhara 3 jpg webp

तन्वीने मॉडेलिंगपासून आपल्या करिअरला सुरवात केली. तिची टीव्हीवरील ‘मुस्कुराने की वजह तुम हो’ या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी निवड झाली. तन्वीची ही पहिली मालिका असून इतर कथांपेक्षा वेगळी कथा या मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. अनोखी प्रेमकथा त्यात दाखवण्यात येणार आहे. तन्वी या मालिकेत एका आशावादी मुलीची भूमिका साकारणार आहे. ती एका एनजीओसाठी काम करत असते.

अविवाहित असताना गर्भवती राहिल्यानंतर एकटीच बाळाला वाढवण्याचा निर्णय घेते. समाजातील सर्व घटकांना ती जिद्दीने तोंड देते. ती अशा व्यक्तीच्या शोधात असते जो तिला आहे त्या अव्यवस्थेत सांभाळण्यास तयार होईल. या वेळी तिला कबीर अर्थात कुणाल जयसिंग भेटतो. जो एक व्यावसायिक दाखवलेला आहे. तो तिला भेटतो. तिच्या खरेपणावर प्रभावित होतो आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार होतो अशी प्रेमाची सुरुवात या मालिकेत दाखवण्यात येणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now