T20 World Cup : भारत-पाक फायनल मध्ये भिडणार? हे दोन सामने संपूर्ण समीकरण ठरवतील

नोव्हेंबर 6, 2022 11:40 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२२ । ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषक 2022 मधून चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. या स्पर्धेतील टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना बघायला मिळू शकतो. खरतर आज रविवारी (६ नोव्हेंबर) सकाळी अ‍ॅडलेडमध्ये नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला सामना झाला. यामध्ये आफ्रिकन संघाचा 13 धावांनी दारूण पराभव झाला. यासह भारतीय संघाचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झाले आहे.

ind vs pak jpg webp

मेलबर्नमध्ये आज भारताचा शेवटचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. यात भारताचा पराभव झाला तरी फरक पडणार नाही. आफ्रिकेच्या पराभवासह भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा तिसरा संघ ठरला आहे. पण आता ग्रुप-2 मधून उपांत्य फेरी गाठणारा चौथा संघ कोण असेल? पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यानंतर काही वेळाने त्याचा निर्णय घेतला जाईल. हा सामना जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीत पोहोचेल. म्हणजेच दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाने गट-१ चे संपूर्ण समीकरणच बदलून गेले आहे.

आतापर्यंतच्या समीकरणाचा विचार केला तर 2022 च्या T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत तीन संघांनी आपले स्थान पक्के केले आहे. ग्रुप 1 मधील हे न्यूझीलंड आणि इंग्लंड आहेत. तर भारतीय संघ २ गटातील आहे. यासह आता चौथा संघ पाकिस्तान किंवा बांगलादेश असू शकतो. जर पाकिस्तान संघाने आपले स्थान निश्चित केले तर अंतिम फेरीत भारतासोबतच्या सामन्याच्या अपेक्षा खूप वाढतील.

म्हणजेच आता अंतिम फेरीत भारताला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानला एकूण दोन सामने जिंकावे लागतील. पहिला गट सामना बांगलादेशविरुद्ध आहे. येथे जिंकलो तर उपांत्य फेरीतही विजय मिळवावा लागेल.

जाणून घेऊया भारत-पाकिस्तान फायनलचे समीकरण…

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पाकिस्तान संघाला त्यांच्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा पराभव करावा लागणार आहे. हा सामना अॅडलेडमध्ये खेळला जात आहे. या विजयासह पाकिस्तान संघ उपांत्य फेरी गाठू शकेल. जर पाकिस्तान संघाने बांगलादेशला हरवले आणि भारतीय संघाने झिम्बाब्वेला पराभूत केले, तर टीम इंडिया गट-2 च्या स्थानी पात्र ठरेल आणि पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर असेल.

या स्थितीत भारतीय संघाचा उपांत्य फेरीचा सामना इंग्लंडशी होणार आहे. तर पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना न्यूझीलंड संघाशी होणार आहे.
यानंतर उपांत्य फेरीत भारतीय संघासोबत पाकिस्तानलाही आपला सामना जिंकावा लागेल.या सगळ्यानंतर भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचतील. त्यानंतर 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये उभय संघांमध्ये विजेतेपदाची लढत होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now