चिमणराव, म्हातारपणात तुम्ही.. सुषमा अंधारेंनी आ. चिमणराव पाटलांना डिवचले

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२२ । उध्दव ठाकरे गटातर्फे उपनेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) या जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, त्यांची एरंडोल येथे सभा पार पडली. यावेळी सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) आणि आमदार चिमणराव पाटील (यांच्यावर जोरदार निशाणा साधला. चिमणराव, म्हातारपणात तुम्ही गद्दारीचा डाग का लावून घेतला?, असा सवालच सुषमा अंधारे यांनी चिमणराव यांना करून डिवचले आहे.

तसेच यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर शेरोशायरीतून हल्ला चढवला. गुलाब भाऊ, हमने तुमको दिलं दिया दिलदार समझकर, लेकीन तुमने ठुकरा दिया फूटबॉल सझकर, असा शेर सादर करत त्यांनी गुलाबरावांवर टीका केली.

मुख्यमंत्री निवडला की मॉडेल निवडले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा भारी आहेत. ते घटनास्थळी पोहाचण्याआधीच त्यांचा कॅमेरामन पोहोचतो. मुख्यमंत्री निवडला की मॉडेल निवडले?, अशी टीका त्यांनी केली. भाजपने बीएसएनएल बंद पाडला. कारण अंबानींचा जीओ यांना आणायचा होता. सर्फिंग को डाटा, मात्र खाने को आटा नही अशी देशवासियांची अवस्था झाली आहे, अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्रीही केली.