Superb Video : बापाने खरेदी केली सेकंड हॅन्ड सायकल, चिमुकलीला मर्सडिज खरेदीचा आनंद

मे 21, 2022 3:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ । देशात महागाई वाढत असल्याने सर्वसामान्यांना त्याची चांगलीच झळ पोहचली आहे. एकीकडे दरवर्षी चारचाकी बदलणारे गर्भश्रीमंत आपण नेहमीच पाहतो पण दुसरीकडे एकवेळच्या जेवणाचे वांधे असलेले देखील आपल्याला दिसतात. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी एक लहानसा व्हिडीओ ट्विट केला आहे. एका चिमुकलीला आपल्या बापाने जुनी सायकल खरेदी केल्यावर झालेला आनंद मर्सडिज खरेदीपेक्षा मोठा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

superb video dad buys second hand bicycle kid enjoys buying mercedes jpg webp

देशभरात सध्या महागाईवरून रणकंदन उठले असून विरोधक मोदी सरकारला कात्रीत धरू पाहत आहे. महागाईच्या दराने उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्यांचे हाल होत असून पोटापाण्याची सोय करण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महागाई केव्हा कमी होणार हे सांगता येत नसले तरी नागरिकांना रोजचा गाडा चालविण्यासाठी धडपड करावीच लागणार आहे. अशीच एक छान पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

देशातील जवळपास सर्वच आयपीएस आणि आयएएस अधिकारी सोशल मीडियावर विशेषतः ट्विटरवर सक्रिय असतात. छत्तीसगड कॅडेरचे २००२ चे आयएसएस अधिकारी अवनीश शरण यांनी शनिवारी ट्विट करून एक व्हिडीओ शेअर केला आहे. अवनीश शरण यांची सध्या बलरामपूर शहरात नेमणूक आहे. अविनाश शरण यांनी एक १५ सेकंदाचा व्हिडीओ ट्विट करून छानसे कॅप्शन देखील दिले आहे. ‘ही फक्त सेकंडहँड सायकल आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा. त्यांचे हावभाव पाहून त्यांनी नवीन मर्सिडीज बेंझ घेतली असल्याचे जाणवते’ असे त्यांनी म्हटले आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now