⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सनबर्न “2K22” कार्यक्रमाची सुरुवात

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । केसीई अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात सनबर्न २K२२ ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात रांगोळी स्पर्धा, ट्रॅडिशनल डे आणि रोस डे ने झाली.

हा कार्यक्रम १८ एप्रिल २०२२ ते २४ एप्रिल २०२२ पूर्ण आठवडा चालणार आहे. ह्यात विविध सांस्कृतिक उपक्रम घेतले जाणार असून २४ एप्रिल २०२२ ला स्नेहसंमेलन “अंतरंग २K२२” ने समारोप होईल. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी रांगोळी प्रतियोगिता घेण्यात आली. ट्रॅडिशनल डे विथ मॉडर्न ट्विस्ट मद्ये विद्याथ्यांनी विविध पारंपारिक पोशाख परिधान केले.

आईएमआर कॉलेजच्या प्रा. ममता दहाड यांनी परिक्षक घेतले. कोरोना नंतर दोन वर्षांनी कार्यक्रमाची संधी मिळाली असून विद्यार्थी खूप उत्साही आहे. या कार्यक्रमाच्या समन्वयिका प्रा. लीना वाघुळदे आहे. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, प्रा. संजय दहाड, प्रा.डॉ. प्रज्ञा विखार व सर्व विभाग प्रमुखांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.