जळगाव जिल्हा

मृत्यूच्या दाढेतून ८३ वर्षीय आजोबांची सुखरूप सुटका!

ब्रेन हॅमरेजवरील आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी;न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील यांचे यश

जळगाव लाईव्ह न्यूज । वयाची ८३ वर्षे, त्यात अपघाताने डोक्याला झालेली गंभीर दुखापत आणि मेंदूत झालेला रक्तस्राव… अशा अत्यंत नाजूक परिस्थितीत मृत्यूशी झुंज देणार्‍या एका वृद्ध रुग्णाला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील यांच्या कुशल उपचारांमुळे नवजीवन मिळाले आहे. ब्रेन हॅमरेजची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर दशरथ हे पुन्हा स्वतःच्या पायावर चालू लागल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

(वय ८३) रूग्ण स्वच्छतागृहात गेले असताना अचानक तोल जाऊन पडले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला जोरदार मार लागला. दुखापतीमुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि ते बेशुद्धावस्थेत होते. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले. रुग्णाची गंभीर अवस्था लक्षात घेऊन न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील आणि डॉ. विपूल राठोड यांनी तातडीने तपासणी सुरू केली.रुग्णाच्या मेंदूची सीटी स्कॅन तपासणी करण्यात आली. या तपासणीत डोक्याला झालेल्या मारामुळे मेंदूत रक्तस्राव (ब्रेन हॅमरेज) झाल्याचे निदान झाले. याशिवाय शरीराच्या एका बाजूच्या हात-पायांची ताकदही कमी झाल्याचे आढळून आले. मेंदूतील रक्तस्राव आणि रुग्णाची बिघडलेली न्यूरोलॉजिकल स्थिती पाहता परिस्थिती अत्यंत गंभीर होती. वेळेत योग्य उपचार न मिळाल्यास जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती.

८३ वर्षांचे वय, त्यामुळे शस्त्रक्रिया मोठे आव्हान!
रुग्णाचे वय ८३ वर्षे असल्याने शस्त्रक्रिया करणे हे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते. अशा वयात शस्त्रक्रियेपूर्वीची तयारी, भूल, शस्त्रक्रियेदरम्यानची काळजी आणि त्यानंतरची देखभाल या सर्व बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात. मात्र, रुग्णाची गंभीर अवस्था लक्षात घेऊन डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील, डॉ. विपूल राठोड आणि डॉ. अदिती जोशी यांच्या वैद्यकीय पथकाने आवश्यक खबरदारी घेत शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. उपचार आणि योग्य वैद्यकीय देखभालीमुळे त्यांच्या प्रकृतीत सकारात्मक बदल दिसून आले. विशेष म्हणजे, काही दिवसांच्या उपचारानंतर दशरथ हे पुन्हा स्वतःच्या पायावर चालू लागले. ८३ व्या वर्षी गंभीर ब्रेन हॅमरेजवर मात करून त्यांनी पुन्हा चालण्यास सुरुवात केल्याने कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.

वेळीच उपचार हाच ब्रेन हॅमरेजमध्ये महत्त्वाचा
वृद्ध व्यक्तींमध्ये पडल्यामुळे डोक्याला मार लागणे ही बाब अत्यंत गंभीरपणे घेणे आवश्यक आहे. अनेकदा बाहेरून मोठी जखम दिसत नसली तरी मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला असू शकतो. चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, उलट्या होणे, बोलण्यात अडचण येणे किंवा हात-पायांची ताकद कमी होणे ही धोक्याची लक्षणे आहेत. अशा वेळी घरगुती उपचार किंवा वेळकाढूपणा न करता तातडीने रुग्णालयात दाखल करून सीटी स्कॅनसारख्या आवश्यक तपासण्या करणे गरजेचे आहे. योग्य वेळी निदान आणि आवश्यक उपचार मिळाल्यास गंभीर परिस्थितीतही रुग्णाला बरे होण्याची संधी मिळू शकत

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button