⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

विद्यार्थ्यांची यंदा होणार सेतू अभ्यासक्रमातून उजळणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२२ । गेल्या दोन तीन वर्षात कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले गेले तरी ते विद्यार्थ्यांना फारसे कळत व येत नसल्याने शैक्षणिक नुकसान झाले आहे.

भरून काढण्यासाठी यंदादेखील इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात येणार असून, नवीन शैक्षणिक वर्षात जूनमध्ये विद्यार्थ्यांची उजळणी घेऊन त्यानंतर चाचणी घेण्यात येणार आहे.

ऑनलाइन शिक्षणामुळे गेल्या वर्षांपासून इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे शक्य झाले नाही. विद्यार्थी पुढील वर्गात गेले असले तरी विविध विषयांमधील महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नाही.