---Advertisement---
गुन्हे यावल

गेम खेळण्यास आईचा विरोध, यावल तालुक्यातील एकुलत्या एक मुलाने उचलले असे टोकाचे पाऊल…

crime (2)
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । यावल तालुक्यातील हंबर्डी येथे मोबाइलमध्ये गेम खेळण्यास आईने विरोध केल्याने, रागाच्या भरात अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घडलीय. उमेश हेमंत पाटील (१७ वर्ष) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

crime (2)

उमेश हा इयत्ता अकरावीत होता. तो भुसावळ येथे शिक्षण घेत होता. उमेश हा सकाळी मोबाइलमध्ये गेम खेळत होता. त्यामुळे आई त्याच्यावर रागावली होती. यानंतर पाटील दांपत्य शेतात निघून गेले. घरी एकटा असलेल्या उमेशने रागाच्या भरात घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ९ वाजता ही घटना उघडकीस आली. उमेश हा पाटील परिवारातील एकुलता एक मुलगा होता. याप्रकरणी फैजपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली अाहे

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---