जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२२ । जामनेर शहरातील पाचोरा रोड परिसरातील वर्धमान नगरात बिअरबारचे काम सुरू आहे. नागरी वस्तीत बिअरबारला परवानगी देऊ नये व तत्काळ काम थांबवावे अशी मागणी वर्धमान नगरातील रहिवाशांनी पालिका प्रशासनासह पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली.

शहरातील पाचोरा रोड परिसरातील गट क्रमांक २२८ हा अकृषक झाला असून अनेक नागरिकांनी आपली घरे बांधली आहेत. याच गट नंबरमधील प्लॉट क्रमांक ४१ व ४२ मध्ये बिअर बार सुरु करण्याची परवानगी मागितल्याची माहिती रहिवाशांना मिळाली. त्या दृष्टीने संबंधीत व्यक्तीने बांधकामही सुरू केले आहे. सदरची जागा ही रहिवास प्रयोजनार्थ असतांना त्याचा व्यावसायिक वापर केला जाणार असल्याने हे काम तत्काळ थांबवावे. अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी जामनेर पालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार गिरीश महाजन, त्याचप्रमाणे पोलिस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालयाचाही याबाबतच्या प्रति देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने दखल घेऊन ही समस्या सोडवावी, अशी अपेक्षा आहे.
हे देखील वाचा :
- जामनेरमध्ये तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ
- जामनेरमध्ये प्रशासनाची धडक कारवाई; ६७ गोवंशीय जनावरांची सुटका, ५ गुन्हे दाखल
- लग्नाची हळद निघण्यापूर्वीच काळाचा घाला; जामनेर तालुक्यातील नवविवाहितेचा उष्माघाताने मृत्यू
- दुर्दैवी ! जामनेरमध्ये विजेचा शॉक लागून पडल्याने तरुण मजुराचा मृत्यू
- जामनेरमध्ये आयपीएल सट्ट्याचा पर्दाफाश ! १० लाखांच्या मुद्देमालासह चौघे ताब्यात







