ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी खुशखबर ! SSC मार्फत 4300 पदांसाठी बंपर भरती, पगार 1 लाखापर्यंत

ऑगस्ट 11, 2022 1:22 PM

SSC CPO Notification 2022 : कर्मचारी निवड आयोगामार्फत बंपर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठीची अधिसूचना (SSC CPORecruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार (SSC) दिल्ली पोलिसांमध्ये उपनिरीक्षक एक्झिक्युटिव्ह आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात (CAPF) उपनिरीक्षक GD या पदांसाठी भरती होणार आहेत. पदवीधर उमेदवारांना नोकरीची मोठी संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.nic.in ला भेट देऊन अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट आहे.

SSC CPO Recruitment 2022 1 jpg webp

एकूण पदसंख्या : ४३००

रिक्त पदाचे नाव व पदसंख्या :
1 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष)- 228
2 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला)- 112
3 CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 3960

शैक्षणिक पात्रता व वय मर्यादा :
उमेदवार पदवीधर असावा. तसेच वय 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे.

पगार
SI GD CAPF-स्तर-6 (35400-112400/-)
SI कार्यकारी दिल्ली पोलिस – स्तर-6 (35400-112400/-)

निवड पद्धती :
या पदांसाठीची प्राथमिक परीक्षा नोव्हेंबर २०२२ मध्ये होणार आहे. निवड लेखी चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 ऑगस्ट 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.ssc.nic.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now