⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

शिमला फिरायला जाणाऱ्यांसाठी खुशखबर.. विशेष अनारक्षित एक्स्प्रेस सुरु

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । कोरोना पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या हळहळू पूर्वपदावर येत आहे. तब्बल दोन वर्षानंतर देशभरातील कोरोना रुग्ण संख्या नाहीशी झाली आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे. प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने उन्हाळी विशेष गाड्यांव्यतिरिक्त इतर गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेकडून घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर रेल्वेने कालका-शिमला(Kalka Shimla), जम्मू-उदयपूर आणि वांद्रे टर्मिनस-जम्मू दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र (Maharashtra) या राज्यांमध्ये प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना या गाड्या चालवल्याचा फायदा होईल.

उत्तर रेल्वेचे प्रवक्ते दीपक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कालका-शिमला, जम्मू-उदयपूर आणि वांद्रे टर्मिनस-जम्मुतवी दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील:-

०१६२७/०१६२४ कालका-शिमला-कालका अनारक्षित मेल एक्सप्रेस
०१६२७ कालका-शिमला डेली अनारक्षित मेल एक्सप्रेस स्पेशल ट्रेन कालकाहून १४.०४.२०२२ ते ३०.०६.२०२२ पर्यंत दररोज दुपारी १.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ७.३० वाजता शिमला येथे पोहोचेल.

परतीच्या दिशेने, ०१६२४ शिमला-कालका स्पेशल डेली अनारक्षित मेल एक्सप्रेस स्पेशल ट्रेन १५.०४.२०२२ ते ०१.०७.२०२२ पर्यंत दररोज सकाळी ०९.२० वाजता शिमला येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.५० वाजता कालका येथे पोहोचेल.

ही गाडी दोन्ही दिशांना संवारा, धरमपूर हिमाचल, बरोग, सोलन, सालोग्रा, कंडाघाट, शोघी, तारादेवी, जातोग आणि समर हिल स्टेशनवर थांबेल.

०४९७२/०४९७१ जम्मू – उदयपूर – जम्मू साप्ताहिक गरीब रथ एक्सप्रेस
04972 जम्मू – उदयपूर साप्ताहिक गरीब रथ एक्सप्रेस विशेष ट्रेन 14.04.2022 ते 30.06.2022 पर्यंत प्रत्येक गुरुवारी जम्मूपासून सकाळी 05.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 07.35 वाजता उदयपूरला पोहोचेल.

परतीच्या दिशेने, ०४९७१ उदयपूर – जम्मू साप्ताहिक गरीब रथ एक्स्प्रेस स्पेशल ट्रेन १५.०४.२०२२ ते ०१.०७.२०२२ पर्यंत दर शुक्रवारी दुपारी ०२.०५ वाजता उदयपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३.१० वाजता जम्मूला पोहोचेल.

मार्गात, ही विशेष ट्रेन पठाणकोट कॅंट, जालंधर कॅंट, लुधियाना, धुरी, जाखल, हिस्सार, भिवानी, रेवाडी, अलवर, बांदीकुई, दौसा, जयपूर, किशनगड, अजमेर, नशिराबाद, विजयनगर, भीलवाडा, चंदेरिया आणि मावळी स्थानकांवर थांबेल. दिशा..

०४९८२/०४९८१ वांद्रे टर्मिनस – जम्मू – वांद्रे टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट
04982 वांद्रे टर्मिनस – जम्मूतावी साप्ताहिक एसी सुपरफास्ट विशेष ट्रेन 17.04.2022 ते 12.06.2022 पर्यंत दर रविवारी रात्री 09.50 वाजता वांद्रे टर्मिनसवरून निघेल आणि मंगळवारी सकाळी 08.40 वाजता जम्मूला पोहोचेल.