रेल्वे

अहमदाबाद–खरगपूरदरम्यान विशेष रेल्वे धावणार; जाणून घ्या वेळापत्रक आणि थांबे..

जळगाव लाईव्ह न्यूज । सणासुदीच्या काळात रेल्वेत गाड्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने अहमदाबाद ते खरगपूरदरम्यान विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाडीला खान्देशातील नंदुरबार आणि भुसावळला थांबा देण्यात आला आहे. मात्र जळगावला या गाडीला थांबा देण्यात आला नाहीय

पश्चिम रेल्वेच्या जाहिरातीनुसार, गाडी क्रमांक ०२३६३ अहमदाबाद–खरगपूर विशेष गाडी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी अहमदाबादहून रात्री ९.४० वाजता सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.१० वाजता खरगपूर येथे पोहोचणार आहे.

या गाडीला वडोदरा, भरूच, सुरत, नंदुरबार, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, चांपा, रायगड, झारसुगुडा आणि राउरकेला यांसह विविध स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना प्रवासासाठी अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार आहे.

रेल्वेने प्रवाशांना गाडीचे वेळापत्रक, थांबे आणि तिकिटांच्या उपलब्धतेबाबत अधिकृत रेल्वे संकेतस्थळावर माहिती तपासण्याचे आवाहन केले आहे. प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी अद्ययावत वेळापत्रकाची खात्री करावी.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button