---Advertisement---
जळगाव जिल्हा भुसावळ

चला रे भो अयोध्या… ‘या’ तारखेला धावेल भुसावळ मार्गे अयोध्येसाठी विशेष ट्रेन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | 2 फेब्रुवारी 2024 | गेल्या महिन्यातील 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यानंतर अनेक भाविकांना रामलल्लाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. अयोध्येतील रामाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक अयोध्येत दाखल होताना दिसताय. दरम्यान, भाविकांना अयोध्या येथे जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता यावे, यासाठी भारतीय रेल्वेने विशेष आस्था रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

ayodhya special train jpg webp

त्यानुसार भुसावळ मार्गे अयोध्येसाठी विशेष आस्था रेल्वे धावणार आहे. नांदेड येथून भुसावळ मार्गे नांदेड -अयोध्या ही गाडी जाईल. १४ फेब्रुवारीला नांदेड येथून ०७६३६ या क्रमांकाची गाडी पहाटे वाजेला सुटेल. त्यानंतर भुसावळ येथे दुपारी २ वाजेला पोहोचेल. तर अयोध्या येथे ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी १०. ३५ ला पोहोचेल.

---Advertisement---

या स्थानकांवर असेल थांबा
नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, अंकाई, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सटणा, माणिकपूर, प्रयागराज या स्थानकांवर थांबेल. परतीच्या प्रवासात १६ फेब्रुवारी रोजी अयोध्या येथून निघणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी सिकंदराबाद-अयोध्या (०७२९७) ही रेल्वे नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर खंडवा मागें अयोध्या येथे जाईल,

धुळ्यातून धावणार लालपरी
तसेच दुसरीकडे राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातून विशेष अयोध्येसाठी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 10 फेब्रुवारीपासून धुळे आगारातून अयोध्येसाठी पहिली लालपरी धावणार आहे. अयोध्या येथील राम मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांना या बसद्वारे वाराणसी आणि प्रयागराज या ठिकाणी देखील जाता येणार आहे. अयोध्येकरता जाण्यासाठी प्रवाशांना 4 हजार 545 रुपये इतके भाडे आकारले जाणार असल्याची माहिती धुळे आगाराकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता खान्देशातील रामभक्तांना धुळ्यातून थेट अयोध्येतील रामलल्लांचं दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे खान्देशातील प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. खान्देशातील रामभक्तांना धुळ्यातून थेट अयोध्येतील रामलल्लांचं दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे खान्देशातील प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---