⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | सोयाबीनला अजूनही अपेक्षित भाव मिळेना ! जळगावात प्रति क्विंटलला मिळतोय ‘एवढा’ भाव?

सोयाबीनला अजूनही अपेक्षित भाव मिळेना ! जळगावात प्रति क्विंटलला मिळतोय ‘एवढा’ भाव?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या सोयाबीन काढणी सुरु असून शेतकरी बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत. मात्र सोयाबीनच्या दरात अजूनही अपेक्षित भाव मिळत नाहीय. यातच परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे देखील नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला.

राज्यातील बहुतांश बाजारामध्ये सोयाबीनला तिक्विंटल ४००० ते ४२०० रुपयापर्यंतचा दर मिळत आहे. विशेष म्हणजे राज्यात सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा सोयाबीनला ७०० ते ८०० रुपयांनी कमी दर मिळताना पाहायला मिळत आहे.याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतोय. शेतकऱ्यांना अपेक्षीत दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणं कठीण झालं आहे.

जळगावात सोयाबीनला किती दर?
जळगावात किमान भाव ३९२५ रुपये ते कमाल भाव ४२०० रुपये इतका भाव मिळत आहे. भाव वाढीची शेतकऱ्यांना अद्यापही अपेक्षा आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.