जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील जोशी कॉलनी परिसरात हृदयद्रावक घटना घडली. अभ्यासाच्या कारणावरून आईने रागावल्याचे मनाला लावून आठवीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलाने जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रथम हरीश कटारे (वय १५, रा. जोशी कॉलनी) असं मुलाचे नाव असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रथम हा ला.ना. शाळेचा विद्यार्थी असून, तो इयत्ता आठवीत शिकत होता. त्याचे वडील मुंबई येथे कामाला आहेत. तर आई गृहिणी असून ती दुकानात कामाला जाते. त्याची मोठी बहीण १२वीचे शिक्षण घेत आहे. ती अभ्यास करते. पण प्रथम हा अजिबात अभ्यास करत नाही म्हणून मंगळवारी त्याची आई कामाला जाण्यापूर्वी त्याला रागावली. त्याचे वाईट वाटून घेऊन प्रथम याने घरी कोणी नाही असे पाहून घराच्या छताला गळफास घेऊन आत्म#$ हत्या केली.

प्रथम याची आई कामावरून घरी आली तेव्हा तिला त्याने गळ#$ फास घेतल्याचे दिसले. त्यानंतर तिने एकच हंबरडा फोडल्याने उपस्थित लोकांना गहिवरून आले. दरम्यान, मुलाच्या भवितव्यासाठी रागावल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले. एकुलता एक मुलगा गमवावा लागल्याने परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत होते. पुढील तपास पोलिस नाईक सुनील सोनार हे करीत आहे.










