⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

खुशखबर.. दिवाळीपूर्वीच साबणाच्या किमती घसरल्या, किती रुपयांनी झाले स्वस्त? वाचा..

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२२ । विड आणि त्यानंतरच्या रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात अनेक वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. दरम्यान, साबण-डिटर्जंट निर्मात्यांनीही त्यांच्या किमती वाढवल्या होत्या. मात्र अशातच आता साबण कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. साबण (Soap) कंपन्यांकडून साबणाच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. दिवाळीपूर्वीच साबण दर कमी झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. Soap prices fell

20 रुपयांपर्यंत किंमत कमी झाली
रोजच्या वापरातील वस्तू तयार करणाऱ्या FMCG कंपनीने साबणाऱ्या किंमती 15 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या उत्पादनाच्या किंमती घसरल्याने हा निर्णय घेतल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. हिंदुस्तान यूनिलीवर लिमिटेड, गोदरेज यांनी साबणाऱ्या किंमती कमी केल्याची माहिती मिळाली आहे. गोदरेजने 13 ते 15 टक्के किंमती कमी केल्या आहेत.गोदरेज नंबर 1 च्या 5 साबणांच्या पॅकची किंमत 140 रुपयांवरून 120 रुपये करण्यात आली आहे.

कपड्यांचे साबण आणि साबण पावडर यामध्ये सध्या कोणताही बदल झाल्याची माहिती अजून समोर आली नाही. फक्त अंघोळीच्या साबणाच्या किंमतीवर हे बदल करण्यात आले आहेत.

दरम्यान, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की किंमती कमी झाल्यामुळे या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत म्हणजेच ऑक्टोबर ते मार्च या काळात विक्रीत वाढ होईल, विशेषत: महागाईमुळे मागणी कमी होत असताना. जागतिक बाजारात पामतेल आणि इतर कच्च्या मालाच्या किमती घसरल्या आहेत. याच कारणामुळे साबण कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेतही किमती कमी केल्या आहेत.