⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ स्पर्धेसाठी रायसोनीच्या सहा विद्यार्थ्यांची निवड

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२२ । स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२२ हा देशभरातील नामी संस्थांनांनी विद्यार्थ्यांसाठी तयार करून दिलेला मंच आहे. यात विद्यार्थी लाखोंच्या संख्येने सहभागी होतात व आपल्या नवकल्पनांचा, आपल्या कौशल्याचा वापर करून नवीन तंत्रज्ञान विकसित करतात. जेणेकरून मानवी जीवन सुखकर व सोयीस्कर होईल.

तंत्रज्ञानासंबंधित येणाऱ्या विविध समस्यासाठी बाहेरच्या देशांवर अवलंबून न राहता आपल्याच देशात सर्व समस्याचे निराकरण झाले पाहिजे हा या स्पर्धेचा उद्धेश असून शासनाला येणाऱ्या विविध स्थानिक समस्याही या स्पर्धेत विध्यार्थी सोडवण्याचा प्रयत्न करतात तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजननुसार स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ही स्पर्धा घेतली जात असते. त्यात खान्देशातील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

या स्पर्धेतील प्राथमिक फेरीत प्रकल्प प्रमुख म्हणून ऐश्वर्या लुणावत हिने काम बघितले तसेच, वरद साखरे, माधुरी घुगे, मोनिका महाजन, यश सोनार, दिव्या सुरवाडे या विद्यार्थ्यांचाही यात महत्त्वाचा वाटा होता. या विद्यार्थ्यांनी “सर्च इंजिन फोर वेदाज रिलेटेड टेक्स्ट वर्ड” या नावाचा प्रकल्प तयार केला आहे.

विद्यार्थ्यांना संगणक विभागातील प्रा. स्वाती पाटील, प्रा. हिरालाल सोळुंके, प्रा. शीतल जाधव, प्रा. प्रेम नारायण आर्या, प्रा. अंकुर पांडे, प्रा. मोहित तौमर, प्रा.अयाज शेख, प्रा. अविनाश पांचाळ यांचे मार्गदर्शन लाभले. विध्यार्थ्यानी मिळवलेल्या या यशाबद्दल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व ऑकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी अभिनंदन केले.