⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

एरंडोलला युवासेनेतर्फे राज्यपालांच्या निषेधार्थ स्वाक्षरी मोहीम

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२२ । राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईतून राजस्थानी व गुजराती लोक जर बाहेर पडले तर मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वक्तव्य केले होते. मात्र, या वक्तव्यामुळे राज्यपाल कोश्यारी चांगलेच लोकांचा नजरेत आहे आहेत. त्यांनी केलेल्या या वक्त्यव्यामुळे त्यांच्याविरोधात महाराट्राभर निषेध केला जात आहे. एरंडोलात देखील राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात युवासेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यावेळी युवासैनिकांनी राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी केली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी तसेच नागरिकांनी स्वाक्षरी करून निषेध नोंदवला.

महाराष्ट्राचे राज्यपाल हे संविधानीक पद असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वारंवार या पदाची प्रतिष्ठा घालवीत आहेत. महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास असून १०६ हुतात्म्यांनी त्यासाठी बलिदान दिले आहे. मागील काळात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीत देखील असेच बेताल वक्तव्य करून मराठी माणसाच्या भावना त्यांनी दुखावल्या होत्या. आता पुन्हा देशाच्या आर्थिक राजधानीत मराठी, गुजराती, राजस्थानी असा प्रांतभेद निर्माण करून देशाच्या सामाजिक ऐक्याला सुरुंग लावण्याचे काम त्यांनी केले आहे. अशा बेजबाबदार व्यक्तीस महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्याचा राज्यपाल म्हणून काम करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. केंद्र शासनाने त्यांना त्वरित माघारी बोलावून देशातील सामाजिक ऐक्य अबाधित ठेवावे अशी विनंती आम्ही आंदोलनाद्वारे करीत असल्याचे युवासेनेचे शहर प्रमुख अतुल महाजन यांनी सांगितले.

याप्रसंगी समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील, माजी नगरसेवक सुनील चौधरी, माजी नगरसेवक संजय महाजन, माजी नगरसेवक नितीन बिर्ला, माजी नगरसेवक रुपेश माळी, माजी नगरसेवक प्रमोद महाजन, माजी नगरसेवक राजेंद्र ठाकूर, काँग्रेसचे राजेंद्र चौधरी, मदन भावसार, विलास पोरवाल, उपशहर प्रमुख सुनील मराठे, युवासेनेचे तालुका समन्वयक कमलेश पाटील,परेश बिर्ला, गजानन महाजन, शहर समन्वयक अमोल भावसार, संदीप पाटील, चंदू जोहरी, युवराज महाजन, कुणाल पाटील, देवेन पाटील, अनिल महाजन, सागर महाजन, पद्माकर मराठे, प्रदीप राजपूत, प्रसाद महाजन, राजेश महाजन, अजय महाजन, भूषण सोनार, जयेश महाजन, मयूर महाजन, अरुण महाजन, गोपाल महाजन, अनिल वाणी, विठ्ठल माळी हे उपस्थित होते.