⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

देवकर फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे पाथरी येथे श्रमदान

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२२ । येथील श्री गुलाबराव देवकर फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाथरी येथे पाच दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात श्रमदान केले. शिबिरात पंचवीस विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत झालेल्या श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांनी पाथरी गावात ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण असे विविध उपक्रम राबवले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्मशानभूमी, ग्रामपंचायत आणि गावातील मुख्य परिसरात विविध प्रकारच्या पर्यावरण पूरक अशा पन्नास वृक्षांची लागवड केली. गावात व्यसनमुक्ती व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांसमोर पथनाट्य सादर केले. या शिबिरासाठी महाविद्यालयाचे संस्थापक तथा जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, विशाल देवकर यांनी विशेष सहकार्य केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ योगेश पवार, अतुल पाटील, जयेश पाटील यांनी परिश्रम घेतले.