⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | जळगाव जिल्हा | बोदवड | धक्कादायक! शेलवडच्या अल्पभूधारक शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

धक्कादायक! शेलवडच्या अल्पभूधारक शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bodwad News-जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२२ । बोदवड तालुक्यातील शेलवड येथील ४७ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचीघटना घडली आहे. याबाबत बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.

संजय सीताराम सोनवणे (सातपुते) वय ४७ असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सोनवणे यांनी स्वतःच्या कपाशीचे व मका पीक लावलेल्या शेतातील कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत शेतकऱ्याकडे साडेतीन एकर शेती असून या वर्षी शेतीसाठी महाराष्ट्र बैंकेचे सुमारे एक लाख रुपये कर्ज घेतले होते. शेतातील दोन एकर मका वारा आणि पावसामुळे पडल्याने नुकसान झाले होते. तसेच नुकत्याच आलेल्या पावसामुळे वेचणीस आलेला कापूस भिजला व कपाशीवर आलेला रोग यामुळे हा शेतकरी चिंतेत होता, असे त्यांच्या मुलाने सांगितले.

मयताचे पश्चात आई पत्नी एक विवाहित मुलगी व दोन मुले असा परिवार आहे. या घटनेबाबत शुभम अहिर यांच्या खबरीवरून बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद घेण्यात आली असून या घटनेबाबत तालुका न्यायदंडाधिकारी खबर प्रत पाठवण्यात आली आहे. पुढील तपास हे पोहेकॉ विलास महाजन हे करीत आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह