धक्कादायक! कस्टमर केअरमधून बोलत असल्याची थाप मारत 90 हजार लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२२ । कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगत भुसावळ येथील दीपनगर विद्युत केंद्राच्या वसाहतीमधील रहिवासी विकास बाबुलाल राठोड यांना भामट्यांने 90 हजारांचा गंडा घातला. गुरुवारी या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अनोळखीविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.


दीपनगर औष्णीक विद्युत केंद्राच्या वसाहतीमधील रहिवासी विकास राठोड यांना त्यांच्या मोबाईलवर रविवार, 15 मे 2022 या दिवशी दुपारी 4.15 वाजता 90021-26127 या क्रमांकावरून कॉल आला. सेंट्रल बँक ऑफ इंडिया दीपनगर शाखेतील बँक खात्यातून फ्लिपकार्ड कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून भामट्याने विश्वास संपादन केला राठोड यांचा डेबीट कार्डचा नंबर वापरून 89 हजार 996 रुपये अ‍ॅनी डेस्क अ‍ॅपच्या माध्यमातून वळते केले. राठोड यांच्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तीविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक विलास शेंडे पुढील तपास करीत आहेत.