बाळासाहेबांच्या वेळेसचे शिवसेनेचे जुने वैभव राज्यात पुन्हा उभे करणार – ना. गुलाबराव पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज | २ जानेवारी २०२३ | नव्या वर्षात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करणार आहे. गेले अनेक वर्षे लोकं वेगवेगळे कार्यक्रम साजरे करतात. मात्र मी मतदारसंघात फिरतोय. कारण बाळासाहेबांच्या वेळेस असणारे शिवसेनेचे जुने वैभव एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पुन्हा उभे करणार असल्याचा संकल्प आम्ही मी केला आहे अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

याच बरोबर ‘उध्दव ठाकरे यांनी ऐकलं नाही म्हणून आम्हाला दुसरा मार्ग पत्करावा लागला” मात्र तो माझ्या जीवनातला दुःखाचा क्षण होता. असे गुलाबराव पाटील म्हणाले.

”पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांचं सर्वांच एक स्वप्न आहे. की हर घर जल आणि हर घर नल. २०२४ मध्ये याच गुलाबराव पाटलाला पाणीवाला बाबा म्हणून लोकं ओळखतील. रोज सकाळी आमचा जनता दरबार असतो. कितीतरी लोकं आमच्याकडे समस्या घेऊन येतात. त्या आम्ही सोडवण्याच काम करतो. आम्ही काय सिझनेबल पुढारी नाहीत. पाऊस आला आणि छत्री उघडली, असहि ते म्हणाले.