⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

शेअर बाजारात तेजी, 4 महिन्यांनंतर सेन्सेक्सने केला 60 हजारांचा टप्पा पार

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । सलग सातव्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. विदेशी आणि देशी गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे 4 महिन्यांनंतर सेन्सेक्सने पुन्हा 60 हजारांचा टप्पा पार केला. निफ्टीही 18 हजाराच्या उंबरवठ्यावर आली आहे. आज बुधवारी व्यवहार संपल्यावर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 417 अंकांनी वधारून 60,260 वर तर निफ्टी 119 अंकांच्या वाढीसह 17,944 अंकांवर बंद झाला.

बाजारातील सर्वच क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.आयटी, फार्मा, एफएमसीजी, ऑटो, एनर्जी, मेटल्स, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑइल आणि गॅस या क्षेत्रांव्यतिरिक्त बँकिंग मीडिया क्षेत्रातही खरेदी दिसून आली. मिडकॅप स्मॉल कॅप समभागही वाढीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअरपैकी 34 शेअर हिरव्या चिन्हात आणि 16 शेअर लाल चिन्हात बंद झाले आहेत. त्यामुळे सेन्सेक्सच्या 30 शेअरपैकी 23 शेअर हिरव्या चिन्हात आणि 7 शेअर लाल चिन्हात बंद झाले आहेत.

या शेअरमध्ये झाली वाढ
वाढत्या शेअरवर नजर टाकली तर बजाज फिनसर्व्ह ५.८१ टक्के, हिरो मोटोकॉर्प ३.४२ टक्के, बजाज फायनान्स ३.३१ टक्के, एचडीएफसी लाइफ ३.२९ टक्के, भारती एअरटेल २.६८ टक्के, टेक महिंद्रा २.४९ टक्के, हिंदाल्को २.३४ टक्के, बीपीसीएल ०१२ टक्के, ग्रा.५२ टक्के वेगाने वाढले

हे शेअर घसरले
घसरलेल्या शेअरवर नजर टाकल्यास, महिंद्रा 1.09 टक्के, अपोलो हॉस्पिटल 1 टक्के, टाटा मोटर्स 0.91 टक्के, सिप्ला 0.85 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.69 टक्के, मारुती सुझुकी 0.66 टक्के, कोल इंडिया 0.65 टक्के, बजाज ऑटो 0.54 टक्के, स्टील 0.54 टक्के. , कोटक महिंद्रा 0.36 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.