---Advertisement---
राजकारण महाराष्ट्र

राज्याच्या राजकीय घडामोडींवर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२३ । राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी शपथ घेतली आहे. पण या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा नाहीय. शरद पवार यांची या घडामोडींवरील पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

sharad pawar 1 jpg webp

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे शरद पवार यांची प्रतिक्रिया सांगितली आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले, मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू. होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही”, असं संजय राऊत यांनी ट्विटरवर सांगितलं आहे.

---Advertisement---
New Project 2
राज्याच्या राजकीय घडामोडींवर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया 1

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---