जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव भुसावळमार्गे रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. शालिमार स्टेशनवरील यार्ड रिमॉडेलिंगचे काम सुरु झाले असून या कामाचा परिणाम अनेक गाड्यांवर करण्यात आल्या आहे. ज्यात भुसावळ आणि जळगाव मार्गे धावणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे.

या गाड्या रद्द?
जळगाव, भुसावळ मार्गे धावणारी गाडी क्रमांक १८०२९ मुंबई-शालिमार कुर्ला एक्स्प्रेस ही ११ ते १९ नोव्हेंबर दरम्यान रद्द राहणार आहे. गाडी क्रमांक १८०३० शालिमार-मुंबई कुर्ला एक्स्प्रेस ही १३ ते २१ नोव्हेंबर दरम्यान तर १२, १३ आणि १९ रोजी १२१५१ मुंबई-शालिमार समरसता एक्सप्रेस, १४, १५, २१ नोव्हेंबर रोजी समरसता एक्सप्रेस रद्द केली आहे.

दरम्यान, प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा ताण कमी करण्यासाठी रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई आणि छपरा दरम्यान काही अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. गाडी क्रमांक ०५०९४ विशेष गाडी मंगळवारी (दि.११) एलटीटी येथून ३.५५ वाजता सुटेल. छपरा येथे तिसऱ्या दिवशी १.४५ वाजता पोहोचेल. ०५०९६ गाडी १२ रोजी एटीटी येथून ३.५५ वाजता सुटून छपरा येथे तिसऱ्या दिवशी १.४५ वाजता पोहोचेल. ०५०९८ क्रमांकाची गाडी गुरुवारी (दि.१३) रोजी एलटीटी येथून ३.५५ वाजता सुटेल. छपरा येथे तिसऱ्या दिवशी १.४५ वाजता पोहोचेल.वरील गाड्यांना कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी या विभागातील स्थानकांवर थांबे मंजूर आहे. आरक्षणदेखील सुरू झाले आहे.











