जळगाव जिल्ह्यात 25 जूनपर्यंत 37 (1) (3) कलम जारी

जून 11, 2021 6:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२१ ।  जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 25 जून, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी जारी केले असून तसे आदेश निर्गमित केले आहे.

Collector-Office-Jalgaon

या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन कार्यालयाची पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही.  परंतु मा. जिल्हादंडाधिकारी जळगाव यांचेकडील आदेश क्र.दंडप्र-01 / कावि/2021/840, दि. 6 जून, 2021 मधील अटी लागू राहतील.

आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now