⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | वाणिज्य | SBI चा कर्जदारांना मोठा झटका ! व्याजदर वाढले, नवे दर आजपासून लागू

SBI चा कर्जदारांना मोठा झटका ! व्याजदर वाढले, नवे दर आजपासून लागू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२४ । तुम्हीही देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) खातेदार असाल कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला झटका देणारी एक बातमी आहे. SBI ने निवडक मुदतींवर निधी-आधारित कर्ज दर (MCLR) 10 बेस पॉइंट्स (bps) पर्यंत वाढवला आहे.त्यामुळे ऑटो लोन आणि पर्सनल लोनसह इतर लोनही महाग होणार आहेत. कर्जदारांना आता जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. नवीन दर 15 जुलै 2024 म्हणजेच आजपासून लागू झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एसबीआयने सहा महिने, एक वर्ष आणि दोन वर्षांच्या कालावधीतील कर्जांसाठी एमसीएलआर दर 0.10 टक्क्यांनी वाढवले आहेत. त्यामुळे हे दर आता अनुक्रमे 8.75 टक्के, 8.85 टक्के आणि 8.95 टक्के झाले आहेत. तीन वर्षांचा एमसीएलआर पाच बेस पॉइंट्सने वाढवून नऊ टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी जूनमध्ये, बँकेने निवडक कालावधीसाठी एमसीएलआर 10 बीपीएसने वाढवला होता.

मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट म्हणजे एमसीएलआर. हा किमान कर्जदर आहे आणि त्यापेक्षा कमी दराने बँका कोणालाही कर्ज देऊ शकत नाहीत. पर्सनल आणि कार लोनच्या ईएमआयवर एमसीएलआरचा थेट परिणाम होतो. एमसीएलआर वाढल्यामुळे नवीन कर्ज महाग होतात. याशिवाय, कर्जदारांच्या सध्याच्या ईएमआयमध्ये देखील वाढ होते.

एसबीआय ईबीएलआरमध्ये बदल नाही
एसबीआयने एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेटमध्ये (ईबीएलआर) कोणताही बदल केलेला नाही. तो 9.15 टक्क्यांवर ठेवण्यात आला आहे. सर्व होम लोन एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेटशी जोडलेले असतात. एसबीआय होम लोनचे व्याजदर 8.50 टक्के ते 9.65 टक्क्यांदरम्यान आहेत. कर्जदाराच्या सिबिल स्कोअरनुसार व्याजदर बदलतो. जर स्कोअर चांगला असेल तर कमी व्याजदराने कर्ज मिळते आणि सिबिल स्कोअर कमी असेल तर व्याजदर वाढतात.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.