⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | नोकरी संधी | तरुणांसाठी खुशखबर ! SBI मध्ये ६१०० रिक्त जागांसाठी भरती, आजचं अर्ज करा

तरुणांसाठी खुशखबर ! SBI मध्ये ६१०० रिक्त जागांसाठी भरती, आजचं अर्ज करा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जुलै २०२१ । कोरोना काळात बेरोजगार झालेल्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. भारतीय स्टेट बँक (SBI)मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आणि याची तयारी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेत एकूण ६१०० रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. एका वर्षासाठी अप्रेंटिस पदाकरिता ही भरती केली जाणार आहे. 

यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. तसेच परीक्षेद्वारे होणाऱ्या भरतीतून निवडल्या गेलेल्या उमेदवारास दरमहा १५ हजार पगार मिळणाार आहे. ही प्रक्रिया ६ जुलैपासून सुरु झाली असून उमेदवार २६ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज सबमिट करु शकतात.

पदाचे नाव :  अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

पात्रता : 

भारतीय स्टेट बँक (SBI)मध्ये ६१०० अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना पात्रता निकष जाहीर करण्यात आले आहेत. या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

उमेदवारांचे वय ३१ ऑक्टोबर २०२१ ला २० वर्षांपेक्षा कमी आणि २८ वर्षांपेक्षा अधिक असू नये.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : या भरतीसाठी जनरल/ओबीसीसाठी ३०० रुपये फी आहे. तर [SC/ST/PWD: फी नाही

पगार : उमेदवारांना सुरुवातीस १५ हजार रुपये दरमहा स्टायपेंड देण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया आणि स्टायपेंड

एसबीआयमध्ये अप्रेंटिससाठी उमेदवारांची निवड ऑनलाईन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. ऑनलाइन लेखी परीक्षेमध्ये जनरल/फायनांशिअल अवेअरनेस, जनरल इंग्रजी, क्वांटीटेटीव्ह अॅप्टीट्यूड आमि रिजनिंग एबिलिटी आणि कॉम्प्यूटर एप्टीट्यूड विषयांचे एकूण १०० प्रश्न असतील. परीक्षा १ तासाांची असेल आणि एकूण शंभर मार्कांची असेल.लेखी परीक्षेमध्ये ०.२५ निगेटीव्ह मार्किंग देखील असणार आहे. लेखी परीक्षेत पास होणाऱ्या उमेदवारांना स्थानिक भाषा परीक्षेसाठी निमंत्रित केले जाणार आहे.

परीक्षा (Online): ऑगस्ट 2021

प्रशिक्षण कालावधी : एक वर्ष

जाहिरात Nitification: PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.