बापरे! शिक्षकाची मधल्या सुट्टीत शाळेतच गळफास लावून आत्महत्या, पाचोऱ्यातील घटना

जून 28, 2025 11:03 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२५ । जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. ज्यात एका शिक्षकाने शाळेच्या मधल्या सुट्टीत वर्गातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. रवींद्र भारत महाले असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून शिक्षकाने हे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण वर्गात शिक्षकाचा मृतदेह पाहून विद्यार्थ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ravindra mahale

पाचोरा स्थित सुपडू भादु विद्या मंदिर शाळेत ही घटना घडली आहे. रवींद्र महाले हे पाचोरा तालुक्यातील दहीगाव संत येथील रहिवासी असून गत काही वर्षांपासून ते पाचोरा शहरातीलच गिरा पंपिंग रोडवर वास्तव्यास होते. ते पाचोरा येथील सुपडू भादु शाळेत कार्यरत होते. त्यांनी आज बुधवारी सकाळी 10.30 वा. शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील एका वर्गात गळफास लावून आत्महत्या केली.

यावेळी विद्यार्थी मधल्या सुट्टीसाठी वर्गाबाहेर गेले होते. वर्गात कुणीही नव्हते. ही संधी साधून रवींद्र महाले यांनी आत्महत्या केली. सुट्टीनंतर विद्यार्थी वर्गात परतले असता त्यांना शिक्षक गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले. हे पाहून त्यांनी एकच आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर ही घटना समोर आली.

शिक्षक रवींद्र महाले यांनी आत्महत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण ही घटना शाळा सुरू असताना घडल्यामुळे विद्यार्थी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिस या घटनेचा सर्वच अंगाने तपास करत आहेत. पण तूर्त मानसिक तणावामुळे रवींद्र महाले यांनी आत्महत्या केली असेल असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now