सावदा शहरात लस उपलब्ध नसल्याने लसीकरण थांबले। नागरीक हैराण

जळगाव लाईव्ह न्यूज । दिपक श्रावगे ।  सावदा येथे मागील महिन्यात “कोव्हेक्सीन” ही लस ग्रामीण रुग्णालयाय उपलब्ध झाल्याने येथे लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. यास सावदा शहरातून नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद देत लसीकरण करून घेतले होते.

मात्र, सध्या येथील लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने येथील लसीकरण थांबले आहे. सगळ्यात जास्त चिंता ज्या नागरिकांनी प्रथम डोस घेतला त्यांना लागली असून कारण “कोव्हेक्सीन” चा दुसरा डोस घेणे त्यांना आवश्यक असून येथील डोस संपल्याने व अनेक नागरिकांना दुसरा डोस घेणे आवश्यक असल्याने व तो मिळत नसल्याने आता चिंता लागली आहे.

दरम्यान येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांचेशी संपर्क केला असता त्यांनी जळगाव येथे मागणी केली. मात्र, तेथे अद्याव देखील हे लसीचे डोस  उपलब्ध नसून ते उपलब्ध झाल्यावर देऊ असे सांगण्यात येत असल्याचे संगीतले. त्यामुळे येथे लस केव्हा उपलब्ध होईल हे सांगता येणार नसल्याचे सांगितले.

दरम्यान भ्रमणध्वनीवरून आ. चंद्रकांत पाटील यांना संपर्क करून विचारले असता त्यांनी जिल्ह्यात सुमारे 40 हजार डोस आज उपलब्ध झाले असून लवकरच येथे पुन्हा लसीकरण सुरू होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.