जळगावात उन्हाचा हाहाकार! रावेरमध्ये उष्मघाताने कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

एप्रिल 24, 2026 1:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात उन्हाची दाहकता आता जिवावर बेतू लागली आहे. रावेर शहरातील एका कष्टकरी कामगाराचा उष्मघातामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. योगेश सुधाकर महाजन असे या दुर्दैवी कामगाराचे नाव त्यांच्या अकाली निधनाने रावेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

yogesh mahajan

योगेश महाजन हे अत्यंत कष्टाळू स्वभावाचे होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते दिवसभर बांधकाम क्षेत्रात मोलमजुरी करत असत. मात्र, वाढत्या महागाईत कुटुंबाची ओढाताण होऊ नये, म्हणून ते फावल्या वेळेत दुधाच्या डेअरीमध्येही काम करायचे. दिवसभर कडाक्याच्या उन्हात काम केल्यामुळे त्यांना उष्णतेचा तीव्र त्रास झाला होता.

रात्री अचानक प्रकृती खालावली
उष्णतेच्या झळांमुळे योगेश यांची प्रकृती बिघडली होती. रात्री उशिरा त्यांची तब्येत अधिकच खालावली आणि सुमारे एक वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. कुटुंबाचा एकमेव आधारवड हरपल्याने या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आता उभा राहिला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे. दुपारच्या वेळी वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे (लू) जनजीवन विस्कळीत झाले आहे. योगेश महाजन यांच्या निधनामुळे वाढत्या उन्हाचे गांभीर्य अधिक वाढले असून, नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now