मनपा सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी सरदार खान (पैलवान) यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । जळगाव शहरातील काट्याफैल, शनिपेठ परिसरात रहिवासी शहर मनपाचे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी हाजी सरदार खा रुस्तम खा पैलवान (वय-८२) यांचे सोमवार दि.१४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा आज रात्री ८.३० वाजता राहत्या घरून मोठ्या कब्रस्थानसाठी निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे.